मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर या देखील सोबत होत्या. त्यांच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
समीर खान आणि त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या घराजवळ असलेल्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर दोघेही बाहेर आले. यानंतर समीर यांनी ड्रायव्हरला गाडी घेऊन येण्यास सांगितले.
ते दोघे हॉस्पिटल बाहेर गाडीची वाट पहात होते. यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान हे मल्टिफॅक्टर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे ऑपरेशन देखील पार पडले आहे. सध्या समीर आयसीयूमध्ये असून आणखी काही काळ अंडर ऑबजर्वेशन मध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.