सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या 35 वर्षाची महिला डॉक्टर बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे.
विजापूर रस्त्यावरील द्वारका नगरी परिसरात या डॉक्टर राहतात. शनिवारी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांची पती यांच्याशी मंदिर परिसरात भेट झाली. या भेटीत मी देवदर्शन करून घरी येते, तुम्ही घरी चला’ असं सांगून देवदर्शनासाठी मंदिरात गेल्या. मात्र त्या २४ तास उलटले तरी घरी आल्या नाहीत.
त्यांचा घराच्या आजुबाजुच्या परिसरात, एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता, त्या मिळून आल्या नाहीत.