बाप्पाच्या विसर्जनला गेलेल्या २ तरुणांचा बुडून मृत्यू

नाशिक : संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच नाशिक मधुन एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. येथे विसर्जनाला गालबोट लागले असून नदीपात्रात बुडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


दोन युवक सायंकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी वालदेवी नदी पात्रात खोल खड्ड्यात पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओंकार गाडे व स्वयंम मोरे अशी या दोन मृत युवकांची नावे आहेत.


या दोघांना वाचवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहचण्याआधीच दोघांचाही मृत्यू झाला होता. तब्बल एक तास प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढले.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस