नाशिक : संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच नाशिक मधुन एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. येथे विसर्जनाला गालबोट लागले असून नदीपात्रात बुडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दोन युवक सायंकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी वालदेवी नदी पात्रात खोल खड्ड्यात पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओंकार गाडे व स्वयंम मोरे अशी या दोन मृत युवकांची नावे आहेत.
या दोघांना वाचवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहचण्याआधीच दोघांचाही मृत्यू झाला होता. तब्बल एक तास प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढले.