Thursday, July 3, 2025

Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान!

Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान!

राज्यातील २७ जागांवर पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरूवात


जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. (Jammu and Kashmir Assembly election 2024) यामध्ये राज्यातील २७ जगांवर सकाळी ९ वाजेपर्यंत ११.११ टक्के मतदानाची नोंद झाली. तर सकाळी ११ वाजेपर्यंत हे प्रमाण सुमारे १४ टक्के झाल्याचे निदर्शनास आले.


राज्यात तब्बल १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जम्मू विभागातील ३ जिल्ह्यांतील आणि काश्मीर खोऱ्यातील २४ जागांवर मतदान सुरू असून ९० अपक्षांसह २१९ उमेदवार मैदानात असून २३ लाखांहून अधिक मतदाते या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.

Comments
Add Comment