मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनी काही खास प्लान्स ऑफर करत असते जे स्पेशल युजर्ससाठी असतात. असाच एक प्लान ८९५ रूपयांचा असतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि अनेक फायदे लाँग टर्मसाठी मिळतात.
या प्लानमध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. कंपनी २८ दिवसांच्या १२ सायकलची व्हॅलिडिटी ऑफर करते. म्हणजेच तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.
हा प्लान २४ जीबी डेटासोबत येतो. डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळेल. कंपनी दरदिवशी २८ दिवसांसाठी तुम्हाला २ जीबी डेटा ऑफर करणार आहे.
अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग
या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. कंपनी २८ दिवसांसाठी ५० एसएमएस मिळतात. तुम्हाला २८ दिवसांसाठी हे एसएमएस मिळतात. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस देत आहे.
या प्लानमध्ये तुम्हाला या प्लॅटफॉर्मचा प्रिमियम अॅक्सेस मिळत नाही. हा प्लान जिओ फोन युजर्ससाठी आहे.
जर तुम्ही एक सामान्य जिओ युजर्स आहात तर या प्लानचा फायदा नाही उचलू शकत. त्या स्थितीत तुम्हाला १८९९ रूपये खर्च करावे लागतील.