मुंबई: सलमान खानचा सिनेमा बजरंगी भाईजानमध्ये मुन्नीची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. तसेच ती टॅलेंटेडही झाली आहे. हर्षाली १६ वर्षांची झाली आहे आणि बेली डान्समध्ये ती प्रावीण्य मिळत आहे. याची तिसरी लेव्हल तिने पास केली आहे.
हर्षाली व्हिडिओ शेअर करत टॅलेंटही दाखवले आहे. व्हिडिओमध्ये ती अतिशय स्मूद पद्धतीने कमर लचकवताना दिसत आहे. हर्षालीने व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, लेव्हल ३.स्वत: कोरिओग्राफ केलेला बेली डान्स. फक्त फ्लोमध्ये आहे, थांबायचे नाही.
View this post on Instagram
तिच्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. लिहिले की मु्न्नी किती मोठी झाली आहे आणि किती काबिलही. सिनेमांमध्ये कधी येणार. हर्षालीने केवळ बेली डान्समध्ये ट्रेनिंग घेतलेले नाही तर ती क्लासिकल स्टाईलही शिकत आहे. ती आपली अॅक्टिव्हिटी नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
हर्षालीने सांगितले होते की ती एक वर्षाची असल्यापासून कथ्थक शिकत आहे. पहिल्या वर्षाची परीक्षा पास झाली आहे. हर्षालीला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. यासाठी तिने अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्येही क्लासेस केले होते. याशिवाय ती अभ्यासातही पारंगत आहे.