Wednesday, July 9, 2025

पंतप्रधान मोदींचा आज ७४वा वाढदिवस, अमित शाह, नितीश कुमार यांनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींचा आज ७४वा वाढदिवस, अमित शाह, नितीश कुमार यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला ७४वा वाढदिवस साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटले, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्ट लाभो.

 



केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा देताना म्हटले, पंतप्रधान मोदींना जन्मदिवसाच्या शुभेच्छा. आपले अथक परिश्रम, साधना तसेच दूरदृष्टीने समस्त देशवासियांच्या जीवनात सकारात्मक बदल आणणारे आणि भारताचा गौरव वाढवून जगात नवी प्रतिष्ठा मिळवून देणारे लोकप्रिय पंतप्रधान मोदींना जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा.



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शुभेच्छा दिल्यात ते म्हणाले, १४० कोटी देशवासियांचे जीवन सुखमय बनवण्यासाठी अविरत परिश्रम करणारे, जगातील लोकप्रिय राजनेते, एकभारत-श्रेष्ठ भारतचे स्वप्नदृष्टा, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Comments
Add Comment