मुंबई: गुजरातच्या वलसाड जिल्ह्यामध्ये एक दुर्देवी घटना पाहायला मिळाली. येथे मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हृदयरोगाचा झटका आल्याने आईचा मृत्यू झाला. ही घटना जवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. हे कुटुंब आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीमध्ये दंग होते.
पाहुण्यांचे येणे-जाणे सुरू होते. बर्थडे बॉय गौरीकची आई यामिनीबेन आणि वडील स्टेजवर होते. या दरम्यान यामिनीबेन खाली कोसळली. आजूबाजूच्या लोकांनी तिला उठवले आणि रुग्णालयात नेले. तेथे तपासाअंती डॉक्टरांनी किरणला मृत घोषित केले. कुटुंबातील आनंदाचे वातावरण दु:खात रूपांतरित झाले.
मुलाच्या बर्थडे पार्टीमध्ये आईला हॉर्ट अॅटॅक
सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यानुसार कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक डीजेवर डान्स करत होते. बर्थडे बॉय गौरीकची आई यामिनीबेन आणि त्याचे वडील पार्टीची मजा घेत होते. तेव्हा यामिनीबेनने आपले डोके पतीच्या खांद्यावर ठेवले आणि ती मंचावरून खाली पडली. यानंतर पार्टीत एकच गोंधळ झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.