मुंबई: हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने मंगळवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४मध्ये धमाल करताना खिताब आपल्या नावे केला. फायनल सामन्यात भारतीय संघाची टक्कर मंगळवारी चीनविरुद्ध होती. या सामन्यात विजय मिळवताना भारताला घाम फुटला. मात्र अखेरीस संघाने १-० असा विजय मिळवला.
भारतीय संघासाठी एकमेव गोल चौथ्या क्वार्टरच्या १०व्या मिनिटात डिफेंडर जुगराज सिंहने केला. यांआधी सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीत होते. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये जुगराजने मॅचविनिंग गोल करत खिताब आपल्या नावे केला.
हा फायनल सामना चीनच्या हुलबुनबुईरमध्ये होता. याआधी भारतीय संघाने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाला ४-१ असे हरवत फायनलमध्ये स्थान मिळवले होते. दुसरीकडे चीनचा संघ पहिल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र त्यांना खिताब मिळवता आला नाही.
पाकिस्तानने कोरियाला ५-२ असे हरवले
याच दिवशी स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि कोरिया यांच्यात सामना रंगला. यात पाकिस्तानी संघाने ५-२ असा शानदार विजय मिळवत तिसरे स्थान मिळवले.
भारतीय संघाने सर्वाधिक ५ वेळा खिताब जिंकला
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक ५ वेळा खिताब जिंकला आहे. पुरूष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला हंगाम २०११मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानला हरवत खिताब जिंकला होता. यानंतर भारतीय संघाने २०१३, २०१८, २०२३ आणि २०२४चा हंगाम जिंकला आहे. २०१८मध्ये भारतीय संघ पाकिस्तान संघासोबत संयुक्त विजेतेपद मिळवले होते.