Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीDiabetes: या कारणामुळे लहान मुलांमध्ये वाढत आहे डायबिटीज

Diabetes: या कारणामुळे लहान मुलांमध्ये वाढत आहे डायबिटीज

मुंबई: डायबिटीज सध्याच्या जीवनशैलीमध्ये सर्वात मोठ्या समस्यापैकी एक आहे. भारतात अनेक लोक याचा सामना करत आहेत. आतापर्यंत हा आजार केवळ मोठ्या माणसांमध्ये आढळत होता. मात्र आता या आजाराचा विळखा लहान मुलांनाही बसत आहे. यामागचे कारण आहे ते म्हणजे खराब लाईफस्टाईल. मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी डायबिटीजचे कारण बनत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये डायबिटीज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुलांमध्ये प्रामुख्याने टाईप १ डायबिटीजचा धोका आढळत आहे तर काही मुलांमध्ये टाईप २ डायबिटीज आढळत आहे. कमी वयात मधुमेहाच्या समस्या, अनेक प्रकारच्या गुंतागुंतीमुळे क्वालिटी ऑफ लाईफ खराब होत आहे.

मुलांमध्ये डायबिटीजची ही लक्षणे आढळतात

सतत बाथरूमला जाणे
मूत्राशयामध्ये संसर्ग होणे
जखम लवकर बरी न होणे
खूप तहान लागणे
थकवा आणि धुंद डोळे
रक्तात ग्लुकोजचे प्रमाण अधिक असणे
उलटीसारखे वाटणे

डायबिटीज रोखण्यासाठी काय करावे

मुलांना निरोगी जेवणाचे महत्त्व समजावून द्या. जंक फूडपासून दूर ठेवा. खाताना स्क्रीनपासन दूर ठेवा. अधिक पाणी पिणे. फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करणे. हळू हळू खाणे. कुटुंबासोबत जेवण करा.

आपल्या मुलाला कमीत कमी ६० मिनिटांच्या फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये सामील करा. यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहील आणि डायबिटीजपासून वाचता येईल.

मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष द्या. यामुळे अभ्यासात मन लागेल. लोकांशी कनेक्ट करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -