मुंबई: फिरण्याचे शौकीन असलेल्यांसाठी परदेशात फिरायला जाणे हे जणू स्वप्नवत आसते. मात्र अनेकदा आपल्या बँक बॅलन्समुळे आपल्याला फिरता येत नाही आणि फॉरेन ट्रिप साकारता येत नाही. जर तुमच्यासोबतही असेच होते तर आम्ही तुम्हाला ५ अशा देशांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही ३० हजार रूपयांच्या आत अगदी आरामात परदेशात फिरू शकता.
नेपाळ
नेपाळची राजधानी काठमांडू फिरण्यासाठी अतिशय सुंदर बजेट फ्रेंडली ठिकाण आहे. काठमांडूमध्ये सास्कृंतिक, जुनी मंदिरे तसेच रंगीबेरंगी बाजार तुम्हाला नक्कीच आवडतील. पोखराचे नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील रोमहर्षक स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. येथे फिरण्यासाठी तुम्हाला २०-३० हजारांचा खर्च येईल.
श्रीलंका
श्रीलंकाची राजधानी कोलंबोमध्ये ऐतिहासिक इमारती, तेथील चमचमणारे गल्लीबोळ, रंगीबेरंगी मार्केट आणि तेथील नैसर्गिक सुंदरता नक्कीच आकर्षिक करेल. कँडी शहराजवळील डोंगर, चहाच्या बागा अतिशय सुंदर आहेत. श्रीलंकेत फिरण्यासाठी २५ ते ३० हजारांचा खर्च येईल.
थायलंड
थायलंडमध्ये तुम्ही बँकॉक आणि पट्टाया या शहरांमध्ये फिरू शकता. बँकॉकचे बाजार आणि पटाया शहरातील समुद्र किनारे अतिशय सुंदर आहेत. येथे फिरण्यासाठी २५-३० हजार खर्च येईल.
दुबई
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा असलेला देश दुबईमध्ये फिरण्याचा अनुभव वेगळाच असेल. येथे तुम्ही मॉलमध्ये फिरू शकता तसेच रेगिस्तानमध्ये उंटस्वारी करू शकता. येथे फिरण्याचा खर्च २५-३० हजार येईल.
मलेशिया
मलेशियाची राजधानी क्वालांलपूरमध्ये तुम्ही petronas टॉवर्सवर जाऊन शहराची उंची पाहू शकता. येथील batu गुहा आणि मंदिरांमध्येही फिरू शकता.