Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीNamo Bharat Rapid Rail: 'वंदे भारत' मेट्रो'चं नामांतरण 'नमो भारत रॅपिड रेल',...

Namo Bharat Rapid Rail: ‘वंदे भारत’ मेट्रो’चं नामांतरण ‘नमो भारत रॅपिड रेल’, रेल्वेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या चाचण्या आता पूर्ण झाल्या असून, पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन देशाच्या सेवेत येण्यास सज्ज झाली आहे. पहिला मान याचा गुजरातला मिळाला आहे. दरम्यान, आता वंदे भारत मेट्रोचं नाव बदललं आहे. रेल्वेने आता वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून ‘नमो भारत रॅपिड रेल’ असं केलं आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे गुजरातच्या जनतेला भेट देणार आहेत.

आज वंदे भारत मेट्रोच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नामकरणाचा सोहळा पार पडला. यानंतर वंदे भारत मेट्रो आता नमो भारत रॅपिड रेल अशी ओळखली जाईल. भारतात दररोज करोडो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. दरम्यान, नमो भारत रॅपिड रेलची गुजरातला आज भेट मिळत आहे. ही नमो भारत रॅपिड रेल गुजरातमधील भुज ते अहमदाबादपर्यंत धावणार आहे. आठवड्यातून ६ दिवस ही ट्रेन चालवली जाणार आहे.

नमो भारत रॅपिड रेलचे भाडे किमान ३० रुपये आहे. यामध्ये जीएसटीचाही समावेश करण्यात आला आहे. यासोबतच ५० किलोमीटरच्या प्रवासाला ६० रुपये इतके शुल्क लागणार आहे. नमो भारत रॅपिड रेलमध्ये मासिक पास वैध असणार आहे. साधारण मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठी जारी केलेले तिकीट या ट्रेनमध्ये चालणार नाही. यासाठी वेगळे एमएसटी तिकीट जारी केले जाईल. साप्ताहिक आणि मासिक तिकीट उपलब्ध असेल. प्रवाशांना सात दिवस, १५ दिवस, २० दिवसांच्या एकेरी प्रवासाचे शुल्क भरावे लागणार आहे.

पहिल्या नमो भारत रॅपिड रेलची वैशिष्ट्ये काय?

नमो भारत रॅपिड रेल ही वंदे भारत ट्रेनसारखीच असणार आहे. मात्र उपनगरीय मेट्रो प्रणालीची वैशिष्ट्ये आणि सोयी सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूला इंजिन तसेच स्वयंचलित दरवाजे या नमो भारत रॅपिड रेलमध्ये असणार आहेत. पहिली नमो भारत रॅपिड रेल १० डब्यांची असणार आहे. वंदे भारत आणि नमो भारत रॅपिड रेलमधील प्रमुख फरक हा आहे की, ही ट्रेन पूर्णपणे अनारक्षित असेल. ही ट्रेन सुटण्याच्या वेळेपूर्वी प्रवासी काउंटरवर तिकीट खरेदी करू शकतात. मंत्रालयाच्या चेन्नई येथील आयसीएफमध्ये नमो भारत रॅपिड रेलचे रेक रेल्वे बनवले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -