Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडी"नवरा माझा.." झळकतोय बाटलीवर!

“नवरा माझा..” झळकतोय बाटलीवर!

मुंबई : चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जातात. त्यात आता पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या पॅकेजिंगवर झळकणं हा नवाच प्रकार आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असून तो मान “नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटाला मिळाला आहे आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.

“नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

“नवरा माझा नवसाचा २” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत.

अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -