मुंबई: जर तुम्ही रिलायन्स जिओच्या प्रीपेड सिमचा वापर करत आहात आणि ३ महिन्यांचा म्हणजेच ८४ दिवसांचा प्लान शोधत आहात तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. १००० रूपयांपेक्षा कमी किंमतीतील ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्रीपेड प्लान्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यातील एका प्लानमध्ये तुम्हाला Disney Plus Hotstarचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल.
Reliance Jio Rs 479 Plan
रिलायन्स जिओच्या ४७९ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या व्हॅलिडिटीसह युजर्सला १००० एसएमएस, एकूण मिळून ६ जीबी डेटा आणि डेटा लिमिट संपल्यानंतर ६४केबीपीएसच्या स्पीडने डेटाची सुविधा मिळते. या शिवाय या प्लानमध्ये अनेक जिओ अॅप्स सारखे JioTV, JioCinema आणि JioCloud चीही सुविधा मिळते.
Reliance Jio Rs 799 Plan
या यादीत जिओचा दुसरा प्लान ७९९ रूपयांचा आहे. या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज १००० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला JioTV, JioCinema आणि JioCloud चा अॅक्सेस मिळतो.