मुंबई: जेवण जेवण्याच्या ३० मिनिटेआधी पाणी प्यायल्याने पाचन योग्य पद्धतीने होते. सोबतच वजन घटवण्यासही मदत मिळते. तसेच पाचकरस बनण्यास मदत होते यामुळे पचनास मदत होते. यामुळे तुम्ही कमी प्रमाणात कॅलरीज खातात. जे लोक जेवणाआधी पाणी पितात त्यांचे वजन इतरांच्या तुलनेने वेगाने कमी होते. जेवणाच्या ३० मिनिटे अथवा ९० मिनिटांआधी थंड पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते. जेवणाच्या आधी खूप पाणी प्यायल्याने पोटात अॅसिड पातळ होऊ शकते आणि प्रोटीन तसेच मायक्रोन्यूट्रिएंट्स पचवण्यास कठीण होते.
एका व्यक्ती किती आणि कधी पाणी प्यायले पाहिजे?
पाणी शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. सोबतच यामुळे अनेक आजार दूर होतात. कोणताही मोसम असो स्वत:ला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते.
तज्ञांच्या मते जेवल्यानंतर तुम्ही लगेचच पाणी पित असाल तर त्याचा वाईट परिणाम पचनावर होते. असे केल्याने योग्य पद्धतीने पचन होत नाही आणि अनेक आजार होतात.
जेवल्यानंतर कधी प्यावे पाणी
तज्ञांच्या मते जेवल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटे आधी पाणी पिऊ शकता. जेवल्यानंतर आणि पाणी पिण्याच्या आधी वॉक फायदेशीर ठरतो. असे केल्याने जेवण सहज पचते. तसेच अनेक समस्यांपासून बचाव होतो.