Wednesday, April 30, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करत बांगलादेशचा संघ भारतात दाखल

पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करत बांगलादेशचा संघ भारतात दाखल

मुंबई: पाकिस्तानला त्यांच्यात घरात चारीमुंड्या चीत करत बांगलादेशचा क्रिकेट संघ रविवारी भारतात दाखल झाला. भारत दौऱ्यावर बांगलादेशला २ कसोटी आणि ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. पाकिस्तानविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर बांगलादेशचा आत्मविश्वास चांगलाच बळावला आहे. नजमल हुसैन शंटोच्या नेतृत्वातील बांगलादेशचा संघ चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. शंटोने भारताविरूद्धच्या मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

ढाका येथून चेन्नईसाठी उड्डाण करण्याआधी नजमुल हुसैन शंटोने विमानतळावर पत्रकारांना सांगितले, निश्चितपणे ही आमच्यासाठी आव्हानात्मक मालिका असेल. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर साहजिक संघाचे तसेच देशाचेही मनोबल उंचावले आहे. प्रत्येक मालिका ही आमच्यासाठी संधी आहे. आम्ही दोन्ही सामने जिंकण्यासाठी खेळू.

भारत वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मात्र बांगलादेशच्या कर्णधाराच्या ते सामन्यातील कामगिरी ही रँकिंगवर आधारित नसते. तर सामन्याच्या पाच दिवसांत त्यांचा संघ कशी कामगिरी करतो यावर अवलंबून असते.

भारत वि बांग्लादेश हेड टू हेड

भारत आणि बांगलादेशचे संघ आतापर्यंत १३ कसोटी सामन्यांत भिडले आहेत. येथे ११ सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवता आला. तर दोन सामने अनिर्णीत राहिले. बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध एकही कसोटी सामन्यात विजय मिळवू शकलेला नाही. असेच काहीसे समीकरण बांगलादेशचे पाकिस्तानात होते. बांगलादेशच्या संघाने पाकिस्तान दौऱ्याआधी त्यांना एकदाही कसोटीत हरवलेले नव्हते मात्र यावेळी बांगलादेशने उलटफेर करताना मालिका जिंकली.

Comments
Add Comment