मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर(arjun tendulkar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने मैदानावर कहर करताना गोलंदाजीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाज अर्जुन यावेळेस कर्नाटकमध्ये डॉक्टर थिमप्पिया मेमोरियन स्पर्धेत खेळत आहे. अर्जुन स्पर्धेत गोवा संघाकडून खेळत आहे.
अर्जुनने KSCA-XIविरुद्ध कहर करत सामन्यात ९ विकेट घेत संघाला एक डाव आणि १८९ धावांनी शानदार विजय मिळवला. अर्जुनने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सामन्याच्या पहिल्या डावात ४१ धावा देत ५ विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात ५५ धावा देत ४ विकेट घेत विरोधी पक्षाला ढेर केले.
अर्जुनसाठी पुढील महिन्यापासून सुरू होत असलेला रणजी हंगाम खूप महत्त्वाचा असेल. यात त्याने गोव्यासाठी चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाठी पुढील रस्ता सोपा होईल.
अर्जुनने फर्स्ट क्लासमध्ये १३ सामने खेळलेत यात २१ विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीत अर्जुनने जबरदस्त कामगिरी केली आणि एक शतक ठोकले. त्याने ४८१ धावा केल्या.