Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Photos : अदिती राव हैदरी व सिद्धार्थने केलं दुसरं लग्न! ‘इतक्या’ वर्षांचं अंतर आहे दोघांमध्ये

Photos : अदिती राव हैदरी व सिद्धार्थने केलं दुसरं लग्न! ‘इतक्या’ वर्षांचं अंतर आहे दोघांमध्ये
लोकप्रिय अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली.



अदितीने ही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सर्व चाहत्यांना दिली.



गेली अनेक वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते.



दोघांनी आपल्या नात्यावर कधीच उघडपणे भाष्य केलं नव्हतं. यावर्षी २७ मार्चला साखरपुड्याचा फोटो शेअर करत अदितीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.



अदिती-सिद्धार्थचा तेलंगणा वानपर्थी येथील ४०० वर्षे जुन्या मंदिरात लग्नसोहळा पार पाडला.



दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी सिद्धार्थचं २००३ मध्ये मेघनाबरोबर लग्न झालं होतं मात्र, त्या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.



तर, अदितीचं सिनेमात एन्ट्री करण्याआधी सत्यदीप मिश्राबरोबर लग्न झालं होतं. मात्र, त्यांचाही संसार फार काळ टिकू शकला नाही आणि दोघंही वेगळे झाले.


आता अदिती – सिद्धार्थने दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.



अदिती सध्या ३७ वर्षांची असून सिद्धार्थचं वय ४५ वर्षं आहे. दोघांच्या वयात ७ वर्षांचं अंतर आहे.



दरम्यान, सध्या बॉलीवूडसह दाक्षिणात्य कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
Comments
Add Comment