बिग बॉस मराठी सिझन पाचवा दिवसेंदिवस चांगलाच गाजतो आहे. रविवारच्या एपिसोडमध्ये आर्या जाधवने निक्की तांबोळी च्या कानशिलात लगावली म्हणून तिला घरातून निष्कासित केलं आहे. मात्र घराबाहेर पडताच आर्या जाधवची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या जाधवने तिच्या चाहत्यांसोबत ऑनलाईन संवाद साधलाय. आर्या जाधवने सोमवारी इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन बिग बॉस मराठीच्या घरात घडलेला सर्व प्रकार स्पष्ट सांगितला आहे. दरवाजा उघडताना निक्कीने मला गालावर झापड मारली, त्यानंतर माझी रिअॅक्शन निघाली, असं आर्याने म्हटलंय.
घरात नेमकं काय घडलं?
आर्याने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये म्हटलंय की, “पहिल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्कीची नखं मला खूप लागली होती, तेव्हा मला वाटलं होतं, तिच्यावर काही अॅक्शन घेतली जाईल. मी तिला तिच्या कॅप्टन्सीमध्ये त्रास देणार होती कारण तिने आमच्या ग्रुपच्या कॅप्टन्सीमध्ये खूप त्रास दिला होता, तेव्हाचं मी ठरवलं होतं की आता हिचं भरपूर झालं, आता मला सहन करायचं नाही आहे. मला असं वाटतं की, तेव्हा मी पाहिलं जान्हवी मला ओढत होती आणि निक्कीने मला लाथ मारली, स्वत:ला फक्त अडवण्यासाठी केलं असं तिने तेव्हा सांगितलं.”
आर्या जाधवने स्पष्टच सांगितलं…
आर्या पुढे म्हणाली की, “मला वाटतं की, धक्का-बुक्कीच्या नावाखाली तुम्ही दरवेळीच हिंसा करता, आणि त्या माझ्यामध्ये खूप दिवसांपासून साचलेल्या भावना होत्या. मी असं नाही म्हणत की मी जे काही केलं ते बरोबर आहे. ते माझ्याकडून कसं झालंया विचारात होती मी. हिंसा चुकीची होती. पण यामागच्या भावना ज्या तुम्हाला जाणवत आहेत, ते तुम्हाला योग्य वाटतंय आणि त्याचसाठी तुम्ही मला पाठिंबासुद्धा देताय. कारण तुम्ही पाहिलंय की, हे सर्व ती सुरुवातीपासून सगळ्यांसोबतचं करतेय. बाथरुमचा दरवाजा उघडताना निक्कीने मला स्ट्रॅटिजीकली मारलं. तिने दरवाजा उघडताना मला गालावर झापड मारली, त्यानंतर माझी रिअॅक्शन निघाली.”