नवी दिल्ली : भारत आणि बांगालादेश मालिका आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पण त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक मोठी बाब समोर आली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) आता बांगला देशच्या मालिकेतून बाहेर होणार आहे. गिलला ही मालिका का खेळता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय संघाला बराच दिवसांचा ब्रेक मिळाला होता. त्यानंतर आता भारतीय संघ बांगलादेशबरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईत भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव करत आहे. भारताचा पहिला कसोटी सामना हा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी २० सामन्यांची मालिका होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून गिल हा प्रकाशझोतात आला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये तो खेळला. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड केली गेली. भारताचा फक्त पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर झाला आहे. गिल या सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर गिल दुसऱ्याही सामन्यात खेळताना दिसेल.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की…
भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. हा सामना ७, १० आणि १३ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर लगेच १९ ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे जर गिल टी-२० मालिकेत खेळला तर त्याला या कसोटीत खेळता येणार नाही. त्यामुळे गिलला टी-२० मालिकेमधून बाहेर ठेवणार असल्याची चर्चा सुरू आहे.