आठवणीतले नेदरलॅँड्स

Share

ओंजळ – पल्लवी अष्टेकर

माझ्या मिस्टरांच्या नोकरीमुळे मला नेदरलॅँड्स या देशात एक वर्ष राहण्याची संधी मिळाली. अप्रतिम निसर्गसौंदर्य व कालव्यांचा देश म्हणून नेदरलॅँड्स प्रसिद्ध आहे. नेदरलॅँड्सची राजधानी अ‍ॅमस्टरडॅम हे शहर आहे. येथे डच सरकारचे मुख्यालय आहे. नेदरलॅँड्सला हाॅलंड असेही म्हणतात. यात उत्तर व दक्षिण असे दोन प्रांत आहेत. तेथील रस्त्यांवरून फिरताना विविध रंगांची फुलझाडे पहायला मिळतात. या देशातील हवामान मध्यम सागरी असे म्हणता येईल. पर्जन्यवृष्टी वर्षभर सामान्य आहे. नेदरलॅँड्समधील लोकं स्वच्छताप्रिय व शिस्तप्रिय आहेत. आपला निसर्ग जतन करण्याची हौस इथल्या लोकांना आहे. त्यामुळे शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण इथे पहायला मिळते.

नेदरलॅँड्समधील लोकं आपले बंगले किंवा अपार्टमेंट्सच्या गॅलरीत ‘बर्ड-फीडर’ लावून त्यात विविध पक्ष्यांचे खाद्य भरून ठेवतात. उडणारे पक्षी तेथे क्षणभर विसावून चोचीने आपले अन्न खातात. प्राणीमात्रांवर भूतदया येथे बहुतांशी वेळा आढळून येते. एकदा मी माझ्या मुलाला प्रॅममध्ये ठेवून फेरफटका मारायला निघाले. तेव्हा तिथले दृश्य पाहून अचंबित झाले. रस्त्याच्या कडेला वाढलेले एक सुंदर, नाजूक फुलांचे भले-मोठे जुने झाड क्रेनच्या सहाय्याने हलविणे सुरू होते. तिथून त्या झाडाचे दुसरीकडे पुनर्रोपण करण्यात आले. यासाठी पाच-सहा कामगार मिळून काम करीत होते. निसर्गाप्रती तेथील लोकांची आस्था वाखाणण्याजोगी होती.

नेदरलॅॅँड्स मधील ‘ट्युलिप गार्डन ‘हे जगातील हजारो पर्यटकांचे वेध घेणारे आहे. या देशात सुमारे पाच हजार हेक्टर भागात ट्युलिपची लागवड करण्यात आली आहे. हे जगातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन आहे. हा बगिचा नेदरलॅँड्स मधील ‘क्युकेनहाॅफ’ याठिकाणी आहे. प्रत्येक वसंत ऋतू मध्ये येथे सात दशलक्षहून अधिक ट्युलिप बल्ब इतर विविध फुलांसह फुलतात. हे दृश्य खूप विलोभनीय दिसते. नेदरलॅँड्सच्या ओल्या, सखल परिस्थितीमुळे ट्युलिप्ससाठी परिपूर्ण वाढणारे वातावरण तयार होते.’सिलसिला’ या चित्रपटातील एक गाणे ‘ट्युलिप गार्डन ‘येथे चित्रित केले आहे. आम्ही नेदरलॅँड्समधील ‘डिमेन’ या भागात रहायचो. तिथे आमच्या घराजवळ एक माॅल होता. या माॅलमध्ये सर्व किराणामाल, फळे-भाज्या असे सामान मिळायचे. नेदरलॅँड्सचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील चीज उत्पादने. येथे अंदाजे विस प्रकारचे चीज आढळतात. चीज उत्पादने हा इथला महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. हार्लेम, लाईडन, ऑडेवाॅटर व अल्कमार.

येथे पहिल्या चीज विकण्याच्या बाजारपेठा तयार झाल्या. सध्या नेदरलँड्समध्ये अंदाजे पाच- चीज मार्केट्स कार्यरत आहेत. गौडा हे येथील सर्वात लोकप्रिय चीज आहे. नेदरलॅँड्समध्ये विविध कंपनींच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी येणाऱ्या भारतीय लोकांची ये- जा सुरू असायची. अशा चार-पाच कुटुंबांची आमची ओळख झाली. आम्ही सर्व मैत्रिणी मिळून तिथे गेट टुगेदरचे कार्यक्रम करायचो. आधी एकमेकींशी बोलून पदार्थ ठरवायचो व ते बनवून एकेका मैत्रिणीच्या घरी बसून, गप्पा करीत त्याचा आस्वाद घ्यायचो. तसेच आम्ही ज्या ‘डिमेन्स’ राहायचो, तिथे दर बुधवारी व शनिवारी भाजी मंडई भरायची. डच बाजारात संत्री, सफरचंद, केळी, पेअर्स, चेरीज, स्ट्राॅबेरीज, प्लम्स, विविध प्रकारच्या बेरीज् अशी फळे मिळतात. नेदरलॅँड्सचे राष्ट्रीय फळ ‘सफरचंद’ असे मानले जाते. तसेच भाज्यांमध्ये काकड्या, हिरव्या शेंगा, कांदे, वेगवेगळी सॅलाड्स, पालक, मोठी वांगी आढळतात. काही वेळा आम्ही मैत्रिणी मिळून या बाजारात खरेदीला जायचो. माझ्या दोन-तीन मैत्रिणींनी डच भाषा शिकून घेतली होती. त्यामुळे त्यांचे दैनंदीन जीवनातील व्यवहार सुरळीत चालायचे. ‘डच’ भाषा न येणाऱ्यांसाठी मात्र भाज्या व फळांकडे खुणा करून पाहिजे ते सामान घ्यावे लागे.

या देशात खेळ, व्यायाम या गोष्टींना भरपूर महत्त्व दिले जाते. ‘फुटबाॅल’ हा नेदरलॅँड्सचा राष्ट्रीय खेळ आहे. कोवळ्या प्रकाशात अनेकजण सायकलिंग करताना दिसतात. अ‍ॅमस्टरडॅम व हेगमध्ये सुमारे तीन चतुर्थांश प्रवास सायकलने केला जातो. शारिरीक तंदुरूस्ती व निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तेथील लोक सायकलचा पर्याय निवडतात. आम्ही तिथे ज्या भाड्याच्या घरात रहायचो, त्या घराचे घरमालक दर पंधरा दिवसांनी स्वत:चे घर पाहण्यास येत असतं. त्यांचे घर भाडेकरूंनी स्वच्छ व टापटीप ठेवले आहे की नाही हे ते पाहत. असा तिथे कायदाच असल्याचे तिथल्या माझ्या दोन- तीन मैत्रिणींनी सांगितले. अंदाजे सतराव्या शतकापासून नेदरलॅँड्समध्ये कालवे बनविण्यास सुरुवात झाली. येथे जमीन कमी व पाणी जास्त यामुळे अनेकांनी आपला संसार बोटीत मांडला आहे. अनेक पर्यटक कालवे पाहायला नेदरलॅँड्स मध्ये येतात. अ‍ॅमस्टरडॅम मध्ये ‘प्रिन्सेनग्राक्टं’ हा प्रसिद्ध कालवा आहे. या शहराच्या इतिहासातील प्रमुख व्यक्तिमत्व असलेल्या प्रिंसच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. हा देश पवनचक्की साठी प्रसिद्ध आहे. पवनचक्कीचे आवश्यक कार्य म्हणजे, सखल प्रदेशातून पाणी उपसणे आणि नंतर ते काठाच्या पलिकडे असलेल्या नद्यांमध्ये टाकणे , जेणेकरून जमीन शेती करता येईल. डच लोकांनी इ. स. बाराशे पासून पवनचक्क्या बांधण्यास सुरवात केली. डच संस्कृतीचे प्रतिक म्हणून पवनचक्की कडे पाहिले जाते. पवनचक्क्या विविध कार्यासाठी बांधल्या गेल्या. जसे की, सिंचनासाठी पाणी वाढविणे. पवनचक्क्यांचे आतापर्यंतचे महत्वाचे कार्य अन्नासाठी धान्य दळणे हे होते. पवनचक्कीचा पर्यावरणीय फायदा म्हणजे वार्यापासून उर्जा निर्माण केल्याने कोणतेही कार्बन उत्सर्जित होत नाही. असा हा नेदरलॅंडस् सर्वांनी पहाण्यासारखा आहे.

Recent Posts

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…

32 minutes ago

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

49 minutes ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

60 minutes ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

2 hours ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

3 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

3 hours ago