Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : संजय राऊत आणि त्याच्या मालकाने शरिरातील रक्त भगवं आहे...

Nitesh Rane : संजय राऊत आणि त्याच्या मालकाने शरिरातील रक्त भगवं आहे की हिरवं याची तपासणी केली पाहिजे!

आमदार नितेश राणे यांची विरोधकांवर बोचरी टीका

मुंबई : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे भाषण सुरु असताना हनुमान चालिसा सुरु झाली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसाचा आवाज कमी करायला सांगितला. तसेच नवनीत राणा यांनी नाशिकमध्ये येऊन छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसा म्हणावी, या गोष्टीवर संजय राऊतने (Sanjay Raut) धर्मावर भाष्य करत विधान मांडले होते. त्या विधानाला भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांवर घणाघात केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक धर्माला आणि व्यक्तीला समान न्याय मिळाला पाहिजे, अशी मान्यता आहे. पण तरीही हिंदुना वेगळा न्याय आणि मुस्लिम धर्मांना वेगळा न्याय का? असा प्रश्न भाजपाकडून वारंवार विचारला जात आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा विषय हाच आहे की, जो न्याय अन्य धर्माला लावला जातो तोच न्याय हनुमान चालिसाला लावला असता तर विरोधकांकडे हिंदुत्ववादी विचारासारख्या कार्यकर्त्यावर टिका करण्याची वेळच आली नसती. छगन भुजबळ यांनी मशिदीतून पाच वेळा वाजणाऱ्या भोंगाबाबत आवाज उचलला असता व त्यानंतर हनुमान चालिसाबद्दल बोलले असते तर त्यांचा मुद्दा सगळ्यांना पटला असता. म्हणूनच इथे हिंदुना वेगळा न्याय आणि मुस्लिम धर्मांना वेगळा न्याय लावला जातो, असा आक्षेप भाजपा पक्षाकडून केला जात असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

त्याचबरोबर हिंदुत्ववादीसाठी लढणारे नवनीत राणा आणि छगन भुजबळ यांची सर्वांसमोर जाऊन हनुमान चालिसा बोलण्याबाबत त्यांची हिंमत काढणाऱ्या माणसाने स्वत: हिंदू धर्म सोडला आहे, हे स्पष्ट झाले आहे. नवनीत राणा निश्चित पद्धतीने हिंदुत्ववादीसाठी कार्य करत आहेत. पण दुसऱ्याने हनुमान चालिसा वाजवावी आणि संजय राजाराम राऊतने अजाणतेसमोर जाऊन नतमस्तक व्हावं हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे संजय राऊत आणि त्याचा मालकाने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या शरिरातील रक्त भगवं आहे की हिरवं झालं त्याची रक्त तपासणी करायची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -