मुंबई : रेल्वेने खालील गाड्या एलएचबी कोचने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक १२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपूर गरीब रथ ६ ऑक्टोबरपासून आणि ट्रेन क्रमांक १२१८७ जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ ५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर ट्रेन क्रमांक १७०६३ मनमाड – काचीगुडा अजिंठा एक्सप्रेस २ जानेवारी २०२५ पासून तर ट्रेन क्रमांक १७०६४ काचीगुडा – मनमाड अजिंठा एक्सप्रेस १ जानेवारी २०२५ पासून धावणार आहे.
सुधारित संरचना
१२१८८/१२१८७ – २० वातानुकूलित- तृतीय इकॉनॉमी आणि २ जनरेटर व्हॅन.
१७०६३/१७०६४ -एक प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित-द्वितीय, पाच वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ जनरल सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.
आरक्षण
ट्रेन क्रमांक १७०६३/१७०६४ (२९ डिसेंबर २०२४पासून सेवांसाठी) बुकींग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेले आहे.