Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबई-जबलपुर आणि काचीगुडा-मनमाड एक्स्प्रेस एलएचबी डब्यांसह चालणार!

मुंबई-जबलपुर आणि काचीगुडा-मनमाड एक्स्प्रेस एलएचबी डब्यांसह चालणार!

मुंबई : रेल्वेने खालील गाड्या एलएचबी कोचने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक १२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपूर गरीब रथ ६ ऑक्टोबरपासून आणि ट्रेन क्रमांक १२१८७ जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ ५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर ट्रेन क्रमांक १७०६३ मनमाड – काचीगुडा अजिंठा एक्सप्रेस २ जानेवारी २०२५ पासून तर ट्रेन क्रमांक १७०६४ काचीगुडा – मनमाड अजिंठा एक्सप्रेस १ जानेवारी २०२५ पासून धावणार आहे.

सुधारित संरचना

१२१८८/१२१८७ – २० वातानुकूलित- तृतीय इकॉनॉमी आणि २ जनरेटर व्हॅन.

१७०६३/१७०६४ -एक प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित-द्वितीय, पाच वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ जनरल सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.

आरक्षण 

ट्रेन क्रमांक १७०६३/१७०६४ (२९ डिसेंबर २०२४पासून सेवांसाठी) बुकींग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -