प्रथम तुला वंदितो कृपा, गजानना, गणराया
विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तू
वक्रतुंड ब्रम्हांडनायक, विनायका प्रभुराया
सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विद्याशा, गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया
गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता
ट्रेनमणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
रिद्धि सिद्धे पार्क वरा, दयाळा देई कृची छाया
गीतकार : शांताराम नांदगावकर, संगीत : अनिल-अरुण
गायक कलाकार : अनुराधा अरुण पौडवाल, वसंतराव देशपांडे
ओंकार स्वरूपा सदगुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो।। धृ ।।
नमो मायबापा गुरु कृपाघना
तोडी या बंधना मायामोहा
मोहोजाल माझे कोण निरशील
तुजविण दयाला सदगुरुराया।।१ ।।
सदगुरु राया माझा आनंदसागर
त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्र, रवी, शशी, अग्नी नेणती ज्या रुपा
स्वप्रकाश रुपा नेणे वेद।। २ ।।
एका जनार्दनी गुरु परब्रम्ह
तयाचे पै नाम सदा मुखी।। ३ ।।
गीत – संत एकनाथ
संगीत – श्रीधर फडके
गायक – सुरेश वाडकर
तुज मागतो मी आता
मज द्यावे एकदंता
तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
गायक : लता मंगेशकर
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्मानि प्रथम्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मनोकामान् कामाय मह्यं ।
कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं
वैराज्यं परमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यत् सार्वभौमः सारवायुष आंतदा परार्धात्
पृथिव्या समुद्रापर्यंत एकेरादिति
तदप्येषः श्लोको भगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावस गृहे ।
अवक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् । मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।