नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड
सागर”
“कॉय गं ताई?”
“असा काय आवाज येतोय”
“काँसा ?”
“तोंडात कोंबल्यासारखा !”
“तुझा?”
नितूने आत डोकावून बघितले; नि ती आश्चर्याने अवाक् झाली.
प्रसादाचे ११ मोदक आईने खपून तयार केले होते नि सकाळी
सकाळी ती आफळेबुवांच्या कीर्तनाला गेली होती. लेकीला म्हणाली,
“मला भारी आवडत त्यांचं कीर्तन.”
“मला पण आई. पण हे सॉलीड होमवर्क !”
“शाळेतल्या शिक्षकांना काही दया माया नाही का गं? अरे श्री
गणेशाच्या सुट्टीत तरी सोडा मुलांना थोडं मोकळं.”
“बघ ना ! निर्दयी आहेत अगदी.”
“असं बोलू नये बाल शिक्षकांबद्दल”
“तू बोलीस तर चालतं!” लेकीनं गाल फुगवले.
“बारं बाई! चुकले मी ! झालं ?”
“हो. ठीक आहे.”
“प्रसादाचे ११ मोदक करून ठेवलेत बाप्पांसाठी.”
“हो. तुपाची धार सोडलीयस्
प्रत्येक मोदकावर !”
“हो गं तायडे, बाप्पाला मोदक तुपासकट खायला द्यावे,
असं मनात आलं, नि तूप कढवलं
ताजं ताजं !”
“कित्ती छान गं आई!”
“बरं! मी जाऊ का आता?”
“कीर्तनाला ना ?”
“हो. कीर्तनालाच. बायकांची गर्दी खूप होते गं बुवांच्यासाठी”
“छानच कीर्तन करतात ते आज गणपतीची गोष्ट रंगवून
सांगतील अगदी.”
“हो गं! आपल्याला ठाऊक असली तरी ऐकायला मजा येते.”
“परत लहान झाल्यासारखं वाटतं ना बायकांना?”
“अगदी खरं! मनाताएं ओळखलस बाबी !” आईनं लेकीचे गाल ओढले.
“मी बाप्पासाठी मोदक केलेत प्रसादाचे. आले की उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवू. आरती केल्यावर नि मग वाटून खाऊ सगळे.”
“बाप्पाची आरती आधी हं आई.”
“हो गं तायडे. ते आधी मग प्रसाद ग्रहण.”
“आई, तू बाप्पाला मानतेस ना?”
“सुखकर्ता, दुःखहर्ता विघ्नेश आहे आपला. बाप्पा माझी सारी
गाऱ्हाणी ऐकतो. प्रेमाने हात ठेवतो डोक्यावर.”
“चल, काहीतरीच काय?”
“खरं तेच सांगत्येय. अगं, भाव तेथे देव !”
“हो! हे बाकी खरं !”
“मग?”
“परीक्षेला जाताना मी जी उजळणी करते ना आई, तीच ापेपरात उपयोगी पडते. बाप्पा सांगतो कानात?”
“तो आहेच सर्वसाक्षी. सर्वज्ञानी.”
“आई, बाप्पाला आपण’ ए ‘कसं गं म्हणतो?”
“ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम असतं त्यांना आपण ‘ए ‘च म्हणतो”
बरं तायडे. आईला ‘ए’ म्हणतेस ना तू ?”
“नि बाबांना अहो!”
“तो आदर झाला. बरं ते राहूदे”
“तू कीर्तनाला जाऊन ये.”
“तू प्रसादाकडे लक्ष दे.”
“हो आई तू काळजीच करू नकोस.”
“बरं ! येते मी !” अशी आई कीर्तनाला गेली.
आत बघून याव म्हणून बाप्पाकडे ताई गेली नि अवाक् झाली.
सारा प्रसाद खल्लास!
“सागर ! अरे काय हे?”
“काय??”
“प्रसादांचे अकरा मोदक फस्त केलेस तू?”
“मला आवाडले.”
“अरे, घरात दुसरी पण तीन माणसे आहेत. मी, आई, बाबा!”
“मला आता नाही राहिलं.”
“आप्पलपोटा. हावरट.”
“बापा समोर अपशब्द उच्चारू नकोस ताई.”
“येऊदे आईला. थाब !” ताईने धमकावले. तास-दोन तास वाट पाहिली. आई आली रे आली की नाव सांगू! आणि ती आली.
“आई, तुझे कष्ट करून केलेले ११ मोदक या हावरटाने फस्त केले.” पण आई रागावलीच नाही. गालगुच्चा घेतला पोराचा.
म्हणाली,, “तूच माझा ‘गणपतिवाप्पा’ आहेस.”
ताई बघतच राहिली !!!