Sunday, October 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे. चैतन्यदायी अनुभव देणारे गणराज हे तुम्हा आम्हा सर्वांचं आवडतं दैवत. श्रावण संपून गेला की भादव्यात चतुर्थी दिनी आगमन होते ते बाप्पाचे. लाडके बाप्पा बसून येतात ते कधी मोरावर, उंदरावर, सिंहावर, हंसावर,स तर कधी पानाफुलात. गणेशोत्सव आनंदाला उधाण आणणारा सण. याच गणरायाला अनेक नावे आहेत. गणेशोत्सव परंपरेची मूर्तमेढ रोवली ती लोकमान्य टिळक यांनी. सामूहिक, सांघिकरित्या या उत्सवाला आपण साजरे करतो. मंगलमय वातावरणात प्रसन्न, संगीतमय आणि स्वादिष्ट नैवेद्य मिष्टान्न.

भक्तिमय वातावरणामध्ये मग कोणी या गणपती बाप्पांना विघ्नहर, लंबोदर, महागणपती, गिरीजात्मक, चिंतामणी, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक असे संबोधतो. असेही आठ अष्टविनायकांपैकी नावे असली तरीही महागणपतीची रूपे प्रसिद्ध आणि सर्वश्रुत आहेत. अथांग भक्तीच्या या अष्टविनायकाला नवस केला की महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर ही यात्रा सुरू असते .वर्षातून एकदा तरी कुळाचार आपण करतो. तसेच अष्टविनायकाचीही रुपे ,महिमा, अख्यायिका महानच आहेत. मंगलमय चैतन्यदायी, सुखदायी सुद्धा. विघ्नहरण करणारे हे महागणपती दैवत भक्तिभावाने परिपूर्ण. आणि उत्साहवर्धक ,पूजनीय, बुद्धीची देवता मंगलकरता आहे. तुझं मागतो मी आता… पासून ते साजरे सुंदर रूप मनोहर, गणनायका गजमुखा गजानना श्री गणराया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया विविध गीते प्रचलित आहेत. सण साजरे करण्यासाठी जशा माहेरवासिनी आलेल्या असतात गौरी- गणपतीच्या सणाला ग बंधू येईल न्यायला अशी अतिशय सुंदर चाल बांधलेली गाणी कानावर पडत असतात. अशी चिकमोत्याची माळ कानात गुंजत राहणारी ही गीते मनातही दुपारच्या सुगंधासह दरवळत असतात. तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता हे देवाचं रूप धूप कापूर दरवळतात आणि सुगंधाचा सुग्रास भोजन आणि देवाचं मनमोहक रूप भक्ती भावाने तल्लीन होणारे वातावरण सुख-शांती, समृद्धी, आत्मबल आणि बुद्धीचा दाता श्री गणेश. हा बाप्पा घराघरात मनामनात येतोच आणि ती भक्ती ,ओढ ,श्रद्धा, सात्विकता आनंदाला उधान देते. तो अवतरतो तेव्हा जल्लोष ढोल-ताशे, नगारे, डीजे, टाळ मृदुंग ढोलकी मिरवणूक खूप काही देऊन जातो. रांगोळ्या, सुवासीक फुले, रोषणाई, सजावट ही स्पर्धा प्रबोधनात्मक संदेश, जनजागृती देते. समाजसेवा फुलते. विविध स्पर्धांतून ऐक्य समता बंधुता हा गुण उदयास येतो . पाहावयास मिळते प्रबोधनाचे हे विषय जाणीव जागृती करून जातात. लोकहिताची कार्य करतात. विविध कार्यक्रमांची आखणी होते. दहा दिवस गजबज होऊन जातात संगीतमय वातावरणामध्ये सगळं कसं मजेत. सारा गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो.

मोठमोठ्या तासान तास चालणाऱ्या आरत्या महाआरत्या आणि त्या आरत्यांत तल्लीन झालेले स्वाधीन झालेले भक्तजन. बाप्पाच्या पायी लीन झालेले भक्तिमय भक्त एकूणच ते दहा दिवस निघून जातात. आणि दिवस येतो तो बाप्पाच्या निरोपाचा क्षण. “गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या” डोळ्यांत अश्रूंनी दिलेला निरोप जीवाला घोर लावून जातो. दमतो, थकतो ,नाचतो अगदी भक्तीमध्ये लीन आणि तल्लीन होऊन त्याचच होऊन जाणं. त्याने मात्र रडवून सोडून निघून जाणं. कोणत्याच वयाच्या गटाला न परवडणार न पेलणार असतं. त्याच्या डोळ्यांत मुकुटात दिसणारं त्याचं रूप. साजरं सुपासारखे कान, मोठं पोट, लंबोदर ,वक्रतुंड वाकडी सोंड ,गोबरे गाल, मोठी ढेरी ,सुंदर जानव, नेसलेले भरजरी पिताबंर, डोक्यावरचा मुकुट, हातात असणारी अस्त्रं, मखमली शेला इतकं सगळं मनोहरी रूप त्याचं मनात साठवून डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखं. बसले सिंहासनी रूप साजरे. असं गोंडस रुपडं सुंदर मनोहर असणारा तो बाप्पा घरातला आणि मनातला गेला की मात्र फार वाईट वाटतं आणि मग कसं मनाला समजावायचं? समजतच नाही! हे बाप्पा आलास आणि लळा लावून गेलास!! दहा दिवस कसे गेले समजलेच नाही? आमच्या आयुष्यामध्ये असंच सुख घेऊन या आणि विघ्नांचा नाश करा ,तू सुखकर्ता तूच दुखहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे चरणी ठेवीतो माथा. एवढा मोठा तुझा पोट आहे आमची चूक माफ करून आमच्या चुका पोटात घे…आणि दरवर्षी आमच्या भेटीसाठी धावत येईल आम्ही तुमच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतोय आणि स्वागतासाठी सज्ज आहे पुढच्या वर्षी लवकर या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -