Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजविश्वासाने घोटला गळा

विश्वासाने घोटला गळा

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

व्यापार म्हणा किंवा धंदा यामध्ये विश्वासाला जास्त महत्त्व दिले जातं आणि विश्वासावर धंदा आणि व्यापार होत असतो. अनंतराव हे शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी होते. चार कोटींची त्यांची उलाढाल होती. त्यांचा व्यापार व्यवस्थित चालू होता. कापड व्यापारामध्ये त्यांचे नाव नावाजलेलं होतं. अनंतराव आपल्या दुकानात कापड एका विशिष्ट व्यक्तीकडूनच घेत होते आणि अनेक वर्षं त्या व्यक्तीबरोबर त्यांचा व्यवहार चाललेला होता. संपत असं त्या व्यक्तीचं नाव होतं. संपत हा अनंतराव यांना कापड पुरवत असे. बोलीवर त्यांचा व्यवहार होत असे आणि अनंतराव संपतला दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळेवर पैसे पोहोचवत आहे. अचानकपणे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनंतराव यांचा कापड व्यापार बुडाला आणि त्यात त्यांना अनेक नुकसान सोसावे लागले. होती नव्हती ती शिल्लकही संपत आलेली होती आणि संपतने अनंतरावकडे पैशाचा तगादा लावला होता. म्हणून अनंत रावाने मी तुला साडेसात लाख रुपये देतो आणि उरलेला तुझा माल तू घेऊन जा असं सांगितलं. संपत ते ऐकायला तयार नव्हता. तो पूर्ण रक्कम अनंतरावाकडे मागत होता. अनंतराव यांनी चेक दिला होता. त्याचे उत्तर फक्त त्यांची सही होती. संपत याने त्याच्यावर रक्कम टाकून तो चेक बँकेत बंद केला आणि कोर्टामध्ये चेक बाउन्स खाली केस दाखल केली. दोन वर्षांनी या केसचा निकाल लागला. अनंतराव यांनी आपला आणि संपतचा व्यवहार अनेक वर्षे होता हे सांगितलं. आमचे व्यवहार चौक होते. ही त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि लॉकडाऊनमध्ये माझा धंदा बुडाला. हे सिद्ध केलं आणि मी त्यांना सात लाख रुपये द्यायला तयार होतो आणि उरलेला मानही द्यायला तयार होतो. हे सांगितलं व सिद्धही केलं. कोर्टाने अनंतराव यांना शिक्षा सुनावली आणि अनंतराव जामिनावरही सुटले आणि कोर्टाने हे मॅटर सेटल करायला सांगितले आणि त्यावेळी ते मॅटर पाच लाखांमध्ये सेटल झालं.

कोर्टाच्या आदेशानुसार संपत्तीला अनंतरावकडून पाच लाख रुपये घ्यावे लागले. अनंतराव हे संपतला सात लाख रुपये द्यायला तयार होते आणि उरलेला मालही द्यायला तयार होते. पण कोर्टाने अनंतराव यांना संपतला पाच लाख रुपये द्यायला सांगितले आणि इथेच ही केस संपवली. संपत याने रागापोटी अनंतराव यांच्यावर केस दाखल केली आणि चेक बाउन्स स्वतःच करून घेतला. त्यांना सात लाख रुपये मिळणार होते, वरून मालही मिळणार होता. पण इथे मात्र पाच लाख रुपये मिळाले आणि वरून त्यांना माल मिळाला नाही. आजपर्यंत विश्वासावर चाललेल्या व्यवहार हा विश्वासघाताने संपला. अनंतराव संपत याला सात लाख रुपये आणि उरलेला माल म्हणजे त्याचे सात आठ लाख रुपये किंमत असेल द्यायला तयार होते. पण आपल्याच धंद्यातील पार्टनर सोबत संपतराव यांनी विश्वासघात केला आणि विश्वासाने दिलेला चेक बाउन्स केला आणि स्वतःच मात्र नुकसानमध्ये गेला.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -