Monday, October 7, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलफळांची सभा : कविता आणि काव्यकोडी

फळांची सभा : कविता आणि काव्यकोडी

एकदा फळांची, भरली होती सभा
राजा हापूस आंबा, दिमाखात उभा
म्हणाला एकेकाने,
सांगा तुमचे नाव
सांगा तुमचे गाव,
सांगा तुमचा भाव

संत्र म्हणे मी नागपूरचा, मला नाही तोड
स्वादाने कधी आंबट, रसदार आणि गोड
लिंबाचाच नातेवाईक,
मी आहे बरं
नारंगीही मलाच,
हाक मारतात खरं

केळं म्हणे मी वसईचा,
खायला आहे मस्त
काहीजण एक डझन,
एका वेळी करी फस्त
शरीराला धष्टपुष्ट,
करतो मी खास
सालीपासून माझ्या ,
जपा तेवढं बास

फणस मी कोकणचा,
ढेरपोट्या म्हणतात सारे
पोटात माझ्या आहेत, खूप खूप गरे
काटेरी अंग तरी, आतून फार गोड
कापा असो, बरका असो, मला नाही तोड

कलिंगड म्हणे मी अलिबागचा,
माझी एकच बात
वरून मी जरी हिरवा, पण लालेलाल आत
उन्हाळ्यात हमखास मी, भेटायला येतो
खाईल त्याला पोटभरून, थंडावा देतो

आंबा म्हणे थांबा आता, घाई नका करू
उरलेल्यांची ओळख, उद्या होईल सुरू
विश्रांतीची वेळ माझी,
बसतो आता अढीत
सभा संपली, घरी पळा,
तुम्हीही बसा गाडीत

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) महाराष्ट्र आरोग्य
विज्ञान विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण
मुक्त विद्यापीठ

चलनी नोटांचा
छापखाना येथे
प्रसिद्ध, धार्मिक
ठिकाण हे कोणते?

२) गुगामल अमरावतीला
पेंच नागपूरला
मुंबईला संजय गांधी
ताडोबा चंद्रपूरला

राष्ट्रीय उद्यानाचा
दर्जा यांना बरं
गोंदियातील उद्यानाचे
नाव काय खरं?

३) भगवंताला वाहतात
केसांतही खोवतात
काहीजण गुलकंद,
अत्तरही करतात

दुसऱ्यांच्या आनंदात
तो मानी सुख
काट्यात राहून कोण
दिसे हसतमुख?

उत्तर –

१) नाशिक
२) नवेगाव
३) गुलाब 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -