Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडी50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला samsungचा स्वस्त फोन लाँच

50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला samsungचा स्वस्त फोन लाँच

मुंबई: Samsungने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे जो सर्वसामान्यांच्या अतिशय बजेटमध्ये आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy M05. कंपनीच्या M सीरिजमधील हा नवा डिव्हाईस आहे. कंपनीने एका वर्षापूर्वी Samsung Galaxy A05ला या स्पेसिफिकेशनसह लाँच केला होता.

यात मोठी स्क्रीन, ड्युअल रेयर कॅमेरा आणि ५०००एमएएची बॅटरी मिळते. यात सिक्युरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सॉर देण्यात आला आहे. स्मार्टफोनला कंपनी चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स ऑफर करेल.

काय आहेत स्पेसिफिकेशन?

Samsung Galaxy M05मध्ये ६.७ इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळतो. हा 60HZ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेज तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यत वाढवू शकता.

फोनमध्ये 50MPचा प्रायमरी रेयर कॅमेरा आणि 2MPचा डेप्थ सेन्सॉर मिळतो. म्हणजेच ड्युअल रेयर कॅमेरा सेटअप मिळेल. सिक्युरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सॉर मिळतो. डिव्हाईसला पावर देण्यासाठी 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

डिव्हाईस Android 14वर oneUI6 वर काम कतो. कंपनीचे हे म्हणणे आहे की या फोनला दोन वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट आणि चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट मिळत राहील. या फोनसोबत तुम्हाला बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही.

किती आहे किंमत?

या फोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेच व्हेरिएंटची किंमत ७९९९ रूपये आहे. तर हा फोन मिंट ग्रीन कलरमध्येही खरेदी करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -