Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या बरबादीला तिन्ही कुटुंबे जबाबदार

PM Narendra Modi : अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या बरबादीला तिन्ही कुटुंबे जबाबदार

पंतप्रधान मोदींचा काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीच्या घराणेशाहीवर आघात

डोडा : जम्मू-काश्मीरला काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या घराणेशाहीने उद्ध्वस्त केले आहे. या तिन्ही कुटुंबांनी मिळून तुमच्यावर जो अन्याय केला आहे, तो पापापेक्षा कमी नाही. अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या बरबादीला तिन्ही कुटुंबे जबाबदार आहेत, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी (PM Narendra Modi) यांची शनिवारी (दि. १४) डोडा येथे रॅली (Doda Rally) काढण्यात आली. त्यानंतर ते सभेत बोलत होते.

सभेला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, आम्ही आणि तुम्ही मिळून सुरक्षित काश्मीर बनवू, ही मोदींची हमी आहे. यावेळी जम्मू-काश्मीरच्या निवडणुका भविष्याचा फैसला करणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक तीन कुटुंब आणि जम्मू-काश्मीरच्या तरुणांमध्ये आहे. एका बाजूला तीन कुटुंबे, तर दुसऱ्या बाजूला स्वप्ने घेऊन निघालेली तरुण मंडळी. या तीन कुटुंबांनी येथे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. जमीन हडप करणाऱ्या टोळ्यांना प्रोत्साहन दिले. तुम्हाला छोट्या सुविधांसाठी तळमळ करायला लावली होती. या तिन्ही कुटुंबातील लोकांनाच सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती करण्यात आल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला.

काश्मिरी पंडितांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, तीन दशकांहून अधिक काळ झाला, या दिवशी आमचे काश्मिरी पंडित टिकलाल टपलू यांना दहशतवाद्यांनी शहीद केले. त्यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांवर अत्याचाराची न संपणारी मालिका सुरू झाली आहे. भाजपने काश्मिरी पंडितांसाठी आवाज उठवला आणि त्यांना पाठिंबा दिला. काश्मिरी हिंदूंच्या वापसी आणि पुनर्वसनासाठी टपलू योजना बनवण्याचे काम करण्यात आले आहे.

दहशतवाद शेवटचा श्वास मोजतोय

पंतप्रधान पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील तीन कुटुंबांनी येथे फुटीरतावाद आणि दहशतवादासाठी मैदान तयार केले. याचा फायदा देशाच्या शत्रूंनी घेतला. त्यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय चालू राहावा यासाठी हे लोक दहशतवादाला खतपाणी घालत होते. त्यांच्या गुन्ह्यांमुळे आमच्या मुलांना जीव गमवावा लागला. ही चंद्रभागा दरी वर्षानुवर्षे चाललेल्या दहशतवादाच्या कालखंडाची साक्षीदार आहे. दिवस उजाडताच अघोषित कर्फ्यू लागू करण्यात आला होता तो काळ आठवा. सर्व दुकाने ठप्प झाली, सर्व कामे ठप्प झाली. तेव्हा केंद्र सरकारचे गृहमंत्रीही लाल चौकात जाण्यास घाबरत होते. येथे दहशतवाद आता शेवटचे श्वास मोजत आहे.

गेल्या १० वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये जो बदल झाला आहे तो स्वप्नापेक्षा कमी नाही. पूर्वी पोलिस आणि सैन्यावर दगडफेक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडांनी नवीन जम्मू-काश्मीर तयार होत आहे. हे सर्व कोणी केले आहे? मोदींनी हे केले नाही, तुम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांनी हे केले आहे. तुमचा हा विश्वास पुढे नेत जम्मू-काश्मीर भाजपने तुमच्यासाठी अनेक संकल्प केले असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांची ४२ वर्षानंतर भेट

४२ वर्षात पंतप्रधानांची डोडा येथे ही पहिलीच भेट असणार आहे. यापूर्वी १९८२ मध्ये इंदिरा गांधी यांनी डोडाला भेट दिली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी किश्तवाडला गेले होते. डोडापासून ते ५८ किलोमीटर अंतरावर आहे.

तीन कुटुंबांची जमीन हडप करणाऱ्या टोळ्यांना फूस

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही आणि तुम्ही मिळून सुरक्षित काश्मीर निर्माण करू, ही मोदींची गॅरंटी आहे. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका भविष्याचा फैसला ठरविणाऱ्या आहेत. एका बाजूला काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचे राजकीय कुटुंबे आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वप्ने घेऊन निघालेली तरुण पिढी आहे. या तीन कुटुंबांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले. तसेच जमीन हडप करणाऱ्या टोळ्यांना फूस दिली. सोयीसुविधांपासून तुम्हाला वंचित ठेवले. या तिन्ही कुटुंबातील लोकांनाच सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -