मुंबई: भारतामध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. देशात विविध ब्रँड्सच्या दारू पिण्याचे अनेक शौकीन आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का की आपल्या देशात कोणत्या देशातून सर्वाधिक दारू मागवली जाते.
एका रिपोर्टनुसार भारतात सर्वाधिक दारू अमेरिकेतून येते. २०२०-२१च्या आकड्यांनुसार देशात अमेरिकेतून एकूण ३२५.५६ मिलियन अमेरिकन डॉलरची दारू आयात केली जाते.
रिपोर्टनुसार २०२०-२१ युकेमधून एकूण १३१.२९ अमेरिकन डॉलरची दारू आयात झाली होती. बेल्जियम या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. येथेून सर्वाधिक दारू आयात केली जाते.
फ्रान्स यामध्ये चौथा असा देश आहे जिथे एकूण १२.६७ अमेरिकन डॉलर दारू आयात झाली होती. सिंगापूर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. येथे एकूण १२.६६ मिलियन दारू आयात करण्यात आली.