मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. जे.पी नड्डा (JP Nadda) तसेच केंद्रीय पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांनी आज मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सौ. वृषाली श्रीकांत शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल, खासदार श्री. मिलिंद देवरा, कौशल्यविकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, आमदार श्री. आशिष शेलार,आमदार श्री. प्रवीण दरेकर, शिवसेना भाजप समन्वयक श्री.आशिष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.