अमरावती : अमरावती शहरात १६ सप्टेंबर रोजी मुस्लीम बांधवाचे ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणुक काढण्यात येतात. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
वाहतुकीचा पर्यायी मार्ग ट्रांसपोर्टनगर ते नागपुरी गेट चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची म एकतर्फा वाहतुक सुरू राहील. चित्रा चौक ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दीपक चौक मार्गे वळविण्यात येईल. हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकाराचा जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक महाजनपुरा मार्गे वळविण्यात येईल.
जवाहर गेट ते टांगा पडाव या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक सराफा – गांधी चौक- जयस्तंभ मार्गे वळविण्यात येईल. लालखडी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक लालखडी रिंगरोड मार्गे वळविण्यात येईल.
तसेच वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्या व महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत करवाई करण्यात येईल. हा आदेश १६ सप्टेंबरच्या (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) सकाळी ८ ते दुपारी ८ वाजेपर्यंत लागू राहील, सर्व नागरिकांनी वाहतुक मार्गातील बदलाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी केले आहे.