मुंबई: आज भाद्रपद महिन्यातील परिवर्तिनी एकादशीचे व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णूंजी पुजा केली जाते. हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी साजरी केली जाते.
ज्योतिषचार्यांच्या मते परिवर्तिनी एकादशी खूप खास मानली जाते कारण या दिवशी श्रीहरी विष्णू योगनिद्रेदरम्यान आपली कूस बदलतात. यामुळेच याला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. ४ महिन्यांच्या योगनिद्रेदरम्यान भगवान विष्णू यांनी एकदा कूस बदलल्यानंतर काही राशींचे अच्छे दिन सुरू होतील.
मेष – मेष राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस होईल. जीवनात आनंदी आनंद येईल. श्रीहरिच्या कृपेने चांगला काळ सुरू होत आहे. भाग्याची साथ लाभेल.
कर्क – कर्क राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये प्रगती मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल. ही वेळ पैसे कमावण्यासाठी चांगली मानली जात आहे. कोणत्याही नव्या कार्याची सुरूवात करू शकता.
तूळ- तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे पद मिळू शकते. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे. परिवर्तिनी एकदशीमुळे तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील.
वृश्चिक – वृ्श्चिक राशीच्या लोकांना अनेक कामांत यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. दाम्पत्य जीवनात आनंद येईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला वेळ आहे.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…