वासराचे नाव ‘दीपज्योती’; व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याच्या शासकीय निवासस्थानी एका गायीने वासराला जन्म दिला आहे. त्या वासराच्या कपाळावर प्रकाशाचे प्रतीक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वासराचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या एक्स मीडिया प्लॅटफॉर्म फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गायीच्या नवीन वासरुसोबत खेळताना दिसत आहे.
नरेंद्र मोदी वासराला कुशीत घेऊन त्याचे खूप लाड करत आहेत.