मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाची त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती (Ganesh Aarti) करण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या समवेत या चिमुकल्यांनी श्री गणेशाची आरती केली. यातील काही विद्यार्थी शेतकरी वेशभूषा करून आले होते. याप्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, माजी खासदार हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.