लातूर : निम्न तेरणा धरणाची (माकणी धरण) पाणी पातळी ६०३.५५ / ६०४.४० मीटर असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५.३१ टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या येव्यामुळे (इन्फ्लो) धरण निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तेरणा नदीमार्गे सोडावा लागणार आहे.
त्यामुळे तेरणा नदी काठावरील शेतकरी, नदीकाठी वस्ती करुन राहीलेले नागरिक यांनी सतर्क राहावे, जेणेकरुन जिवीत व वित्त हानी होणार नाही, असे लातूर पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी कळविले आहे.