Monday, October 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Election 2024 : अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारांची यादी...

Assembly Election 2024 : अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारांची यादी जाहीर!

कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार?

मुंबई : देशभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) वातावरण सुरु असल्याचे दिसून येत आहे. सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) पहिला डाव टाकला आहे. नुकतेच पुण्यात अजित पवार गटाची पक्षांतर्गत बैठक पार पडली. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटामधील २० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सर्व उमेदवारांची यादी जाहीर झाली असून त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची जारी झालेल्या यादीनुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार आहेत. तर रायगड मतदार संघातून अदिती तटकरे व परळी मतदार संघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार आहेत. जाणून घ्या इतर कोणते उमेदवार कोणत्या संघातून लढणार याची माहिती.

कोण असतील उमेदवार?

  • बारामती : अजित पवार
  • उदगीर : संजय बनसोडे
  • आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील
  • दिंडोरी : नरहरि झिरवळ
  • येवला : छगन भुजबळ
  • पुसद : इंद्रनील नाइक
  • वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील
  • पिंपरी : अण्णा बनसोडे
  • परळी : धनंजय मुंडे
  • इंदापुर : दत्ता भरणे
  • रायगड : अदिती तटकरे
  • कळवण : नितिन पवार
  • मावळ : सुनील शेळके
  • अमळनेर : अनिल पाटील
  • अहेरी : धर्मराव बाबा अत्राम
  • कागल : हसन मुश्रीफ
  • खेड : दिलीप मोहिते-पाटील
  • अहमदनगर : संग्राम जगताप
  • जुन्नर : अतुल बेनके
  • वडगाव शेरी : सुनील टिंगरे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -