फोनमध्ये आकर्षक डिझाईनसह अनेक नवकल्पना सादर
जिओने आपला नवीन जिओफोन प्राइमा २ भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. नवीन जिओफोन हा एक स्मार्ट फिचर फोन आहे, जो ग्राहकांना एकदम नवीन आणि वेगळा प्रीमियम मोबाईल अनुभव देणार आहे. शानदार डिझाईन नवीन फोनची स्लीक आणि एलिगंट प्रोफाईलला खूपच आकर्षक बनवते. त्याची शानदार लेदरसारखी फिनिश आणि मॅजिक टच याचा आनंद देते. जिओफोन प्राइमा २ न केवळ दिसण्यात आकर्षक आहे, तर हातात धरायला देखील आनंददायी आहे.
नवीन जिओफोन प्राइमा २ फोनला लक्झरी स्टेटमेंट म्हणून सादर करते. नवीन जिओफोन प्राइमा २ आधुनिक जीवनशैलीला अनुरूप अशी एक आकर्षक डिझाईनची सुंदरता उभारण्यात यशस्वी ठरला आहे.
काय आहेत फीचर्स?
जिओ प्राइमा २ मध्ये ३२० x २४० पिक्सल रिझोल्यूशनसह २.४ इंचाचा क्यूव्हीजीए कर्व्ड डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम चिपसेट देण्यात आला आहे. ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. यात व्हिडिओ कॉलिंगची सुविधा असून युजर्सना कोणत्याही वेगळ्या अॅपच्या मदतीशिवाय समोरासमोर कनेक्ट करता येईल.
इमर्जन्सी फोटो काढण्याची सुविधा
नवीन जिओ पाइमा २ हा फोन काई ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. यात युजर्सना यूट्यूब, फेसबुक आणि गुगल असिस्टंट सारखे अनेक महत्त्वाचे अॅप्स वापरता येणार आहेत. शिवाय जिओ टीव्ही, जिओसिनेमा, जिओ सावन यांसारखे जिओ अॅप्सही या स्मार्टफोनवर चालतात. सर्वसामान्यांच्या खिशाला सहज परवडू शकणाऱ्या या बजेट फोनमध्ये ०.३ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि इमर्जन्सी फोटो काढण्यासाठी रिअर सेन्सरही देण्यात आला आहे. त्याचबरोबर म्युझिकसाठी ब्लूटूथ ५.० आणि वाय-फाय सपोर्टसह ३.५ मिमी हेडफोन जॅक आहे. हा फोन इंग्रजी आणि २२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो.
तसेच जिओफोन प्राइमा२ हा 4G KaiOS वर ऑपरेट होतो आणि यामध्ये क्वालकॉम प्रोसेसर लावला आहे. हे ५१२ एमबी रॅमसह येतो आणि यात सर्व अॅप्लिकेशन होस्ट करण्यासाठी 4GB इंटरनल मेमरी आहे, आणि १२८GB पर्यंतच्या एक्सटर्नल एसडी कार्डचा सपोर्ट करतो. या फोनमध्ये २.४ -इंच एलसीडी स्क्रीन आणि २००० एमएएच बॅटरी देखील आहे.
काय आहे किंमत?
जिओफोन प्राइमा २ फिचर फोन कॅटेगरीमध्ये एक फ्लॅगशिप फोन म्हणून सर्वांत पुढे आहे. हा फिचर फोनच्या साधेपणाला आधुनिक फिचर्ससह जोडून एक नवा इंडस्ट्री स्टँडर्ड स्थापित करतो. फोनला अत्यंत किफायतशीर फक्त २,७९९ रुपयांच्या किंमतीत सादर करण्यात आला आहे.
जिओफोन प्राइमा २ सोबत, तुम्ही केवळ फोनचा वापर करत नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीला सुधारण्याचा अनुभव देखील प्राप्त करता. हे फिचर फोनच्या भविष्यातील एक पाऊल आहे – जिथे सौंदर्य इनोवेशनला भेटते.