पीएम आवास योजनेतून मिळणार हक्काची घरे
मुंबई : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबईच्या डबेवाल्यांसाठी (Mumbai Dabewala) आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सभागृहात पीएम आवास योजनेतून डबेवाल्यांना घरे दिली जाणार असे आश्वासन दिले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळावी यासाठी पाठपुरावा देखील केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आता लवकरच डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत.
आज सकाळी मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेने देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंज्यस करार करण्यात आला. त्यानुसार डबेवाल्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) स्वत:च्या हक्काचे घर मिळणार आहे.
तसेच मुंबई डबेवाल्यांबरोबरच चर्मकार समाजातील बांधवांसाठी देखील या योजनेत घरे दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रियालिटी ३० एकर जागा देणार असून नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर घरांचे बांधकाम होणार आहे. ५०० चौरस फुटांच्या १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. ही घरे डबेवाले आणि चर्मकार समाजाला २५ लाखात दिली जाणार आहेत. त्यामुळे येत्या तीन वर्षांत डबेवाला आणि चर्मकार बंधू यांचे स्वतःच्या घराचं पूर्ण होणार आहे.