Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीLalbaugcha Raja Darshan : लालबागच्या राजा चरणी भेदभाव! सामान्यांना धक्काबुक्की, व्हीआयपींना पायघड्या

Lalbaugcha Raja Darshan : लालबागच्या राजा चरणी भेदभाव! सामान्यांना धक्काबुक्की, व्हीआयपींना पायघड्या

अभिनेत्री सिमरनसोबत घडला धक्कादायक प्रकार

मुंबई : सध्या महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची (Ganesh Utsav 2024) धूम आहे. विशेषत: मुंबईतील लालबाग-परळ या भागात गणेशोत्सवाचा एक वेगळा उत्साह दिसून येत आहे. एकीकडे भाविकांचा बाप्पाच्या दर्शनासाठी आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या लालबागचा राजा ठिकाणी (Lalbaugcha Raja Darshan) मुजोरपणा सुरु असल्याचे दिसून येत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातील लाखो भाविक चरण दर्शनासाठी येत असतात. परंतु राजाच्या चरणी सामान्य लोक आणि व्हीआयपी लोकांमध्ये भेदभाव करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे.

भाविकांसोबत मुजोरीपणा

सध्या लालबागच्या राजाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एकीकडे लालबाग राजाच्या मंडपात काही जण आरामशीर दर्शन घेत आहेत, फोटो काढत आहेत. तर दुसरीकडे सुरक्षारक्षकाकडून सर्वसामान्य भक्तांसोबत मुजोरपणा सुरु आहे. त्यामुळे हा मुजोरीपणा कधी संपणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

सिमरन बुधरूपचा दर्शनाला जाण्याचा वाईट अनुभव

‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप तिच्या आईबरोबर लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेली होती. तिथे तिच्याबरोबर धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने दर्शनाला जाण्याचा अनुभव खूप वाईट होता, असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सिमरनने व्हिडीओ शेअर करून लालबागचा राजा पंडालच्या बाऊन्सर्सनी तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली असा आरोप केला आहे.

त्याचबरोबर सिमरनची आई फोटो काढत असताना कर्मचाऱ्यांपैकी एका व्यक्तीने तिचा फोन हिसकावून घेतला. ती रांगते माझ्या मागे होती. तिने दर्शनासाठी जास्त वेळ घेतला नव्हता. तिच्यापुढे मी असल्याने मी दर्शन घेत होते आणि ती मागे असल्याने फोटो काढत होती. आईने फोन परत मागण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तिला धक्काबुक्की केली’ असे सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -