Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीGovernment job : तरुणांसाठी आनंदवार्ता! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी

Government job : तरुणांसाठी आनंदवार्ता! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी

‘या’ पदासाठी सुरु आहे भरती, असा करा अर्ज

मुंबई : सरकारी नोकरी (Government job) शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालयात रिक्त पदांसाठीच्या भरती जारी केली आहे. या रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन या पदासाठी भरती केली जाणार आहे.

बा.य.ल.नायर धर्मादाय रुग्णालयात १८ जागांसाठी भरती जाहिरात करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे.

शैक्षणिक पात्रता

लॅब टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc पदवी प्राप्त केलेली असावी त्याचसोबत DMLT (Diploma In Medical Laboratory Technology) ची पदवी असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असावा.

कुठे कराल अर्ज?

बा.य.ल नायर धर्मादाय रुग्णाल, डॉ.ए.एल.नायर रोड, मुंबई सेंट्रल-४०० ००८ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

वयोमर्यादा आणि वेतन

१८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०हजार रुपये पगार मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -