‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात पाच दिवसांच्या लाडक्या गणरायाला भाविकांकडून काल (११ संप्टेंबर) निरोप दिला गेला.
सर्व भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच आश्रू नयनांनी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला.
दरम्यान, यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले.
घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या ५ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन काल पार पडले.
मुंबईतील सर्व चौपट्या, जवळपास केलेले तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १५ हजार गणेश मूर्तींचे काल विसर्जन करण्यात आले आहे.
आज गुरुवारी गौरी- गणपतींचे तर उद्या म्हणजे शुक्रवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडणार आहे.
त्यामुळे अजून दोन दिवस भाविकांची गर्दी आणि जल्लोष चौपाट्यांवर असणार आहे.
मुंबई पोलिसांकडून या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे.