मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये तीन अशा गोष्टींचे वर्णन केले आहे की ज्यामुळे व्यक्ती कधीच समाधानी नसतो. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीला या ३ गोष्टी नेहमी अधिकच हव्या असतात.
मात्र या लोभीपणामुळे अनेकदा व्यक्ती आपले नुकसान करून घेत असतो मात्र असे असतानाही त्याची हाव कधीच सुटत नाही.
धन-दौलत अशी गोष्ट आहे ज्यामुळे व्यक्ती कधीच संतुष्ट होत नाही. कोणत्याही धनवान व्यक्तीकडे कितीही संपत्ती असली तरीही त्याला अधिकच हवे असते.
धन ही अशी गोष्ट आहे जे मिळवून व्यक्तीचे मन कधीही भरत नाही. त्याला नेहमी अधिकच हवे असते.
कधीही मनुष्य आपल्या वयाने संतुष्ट नसतो. नेहमी विचार करत असतो.
प्रत्येक व्यक्तीला अधिक आयुष्य हवे असते. कितीही आयुष्य मिळाले तरी कमीच असते.
आचार्य चाणक्य म्हणतात की जेवण म्हणजेच भोजन अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला सतत हवी असते. मात्र तरीही व्यक्ती समाधानी होत नाही.