देवरापल्ली : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात मिनी ट्रक उलटून ७ जणांचा मृत्यू झाला. ही घटना देवरापल्ली मंडलातील चिन्नईगुडेममधील चिलाका पाकला भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजेच्या सुमाराला घडली. पूर्व गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नरसिंह किशोर यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजूने भरलेला मिनी ट्रक टी नरसापुरम मंडलातील बोरामपालम येथून निदादावोलू मंडलातील ताडीमल्लाकडे जात होता. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. अपघातानंतर काजूच्या गोण्यांखाली दबल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. पोलिस आणि स्थानिकांनी पोत्याखालून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात नेले. मृतांमध्ये देबाबत्तुला बुरैया (४०), तम्मीरेड्डी सत्यनारायण (४५), पी. चिन्मुसलय (३५), कट्टाव कृष्णा (४०), कट्टावा सत्तीपांडू (४०), तडीमल्ला येथील तड्डी कृष्णा (४५) आणि कटकोटेश्वर येथील समिश्रगुडेम मंडल यांचा समावेश आहे.