Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीMalaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; इमारतीवरुन उडी मारून...

Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; इमारतीवरुन उडी मारून संपवले जीवन!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास अनिल अरोरा यांनी मुंबईतील वांद्रे इथे राहत्या ठिकाणी आलमेडा पार्क इथल्या इमारतीवरून त्यांनी उडी मारून जीवन संपवले.

वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच मलायका पुण्याहून मुंबईसाठी रवाना झाली आहे. तसेच मलायका अरोराचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान हा देखील अनिल अरोरा यांच्या निधनाबद्दल कळताच त्यांच्या घरी पोहोचला आहे.

दरम्यान, वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. मात्र पोलीस या घटनबाबत अधिक तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -