Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीiPhone Eye Tracking Feature: कमाल! आता iPhone तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार; नवीन...

iPhone Eye Tracking Feature: कमाल! आता iPhone तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार; नवीन फिचर पहाच

IPhone वापरकर्त्यांना आता लवकरच एक फीचर मिळणार आहे, यामुळे तुमचा फोन वापरण्याचा अनुभव बदलेल. आत्तापर्यंत तुम्ही फोन ऑपरेट करण्यासाठी तुमच्या बोटांचा वापर करत होतात, पण iOS १८ अपडेट रोल आउट झाल्यानंतर तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यांच्या हावभावाने फोन ऑपरेट करता येणार आहे.

आपल्या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये iphone कंपनीने आय ट्रॅकिंग फीचरचा समावेश केला आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त डोळ्यांनी तुमचा फोन कंट्रोल करू शकाल.

Apple चे हे नवीन फिचर सध्या iOS १८ डेव्हलपर बीटामध्ये उपलब्ध आहे, पण लवकरच कंपनी iOS १८ चे व्हर्जन जारी करेल. अहवालानुसार, कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये या ऑपरेटिंग सिस्टमचे स्थिर अपडेट यूजर्ससाठी जारी करू शकते.

कंपनीचे म्हणणे आहे की, या फीचरसाठी कोणत्याही नवीन हार्डवेअरची आवश्यकता नाही, हे फीचर फोनमध्ये देण्यात आलेल्या फेस आयडी कॅमेरा फिचरवरच काम करेल.

हे फिचर सेट करण्यापूर्वी, तुमच्या फेस आयडीची कॅमेरा लेन्स क्लिन आणि तुम्ही जिथे आहात तिथे पुरेसा प्रकाश हवा. तुमच्या डोळ्यांच्या हालचालींचा हा कॅमेरा मागोवा घेईल.

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या iPhone किंवा iPad च्या सेटिंगमध्ये जावं लागेल. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, Accessibility मध्ये जाऊन यात तुम्हाला फिजीकल अँड मोटर सेक्शन मध्ये जावे लागेल, यात तुम्हाला आय ट्रॅकिंग फिचर मिळेल, तुम्ही येथून हे फिचर चालू करू शकता.

यानंतर, स्क्रीनवर तुम्हाला Apple कडून काही सूचना मिळतील, त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. तुम्हाला स्क्रीनवर काही डॉट दिसतील. तुम्हाला त्या डॉटवर लक्ष केंद्रित करून ती स्टेप्स पूर्ण करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण करून झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या iPhone मध्ये हे फिचर वापरण्यास सक्षम असाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -