Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीCome Back Serial : टीआरपी वाढीसाठी सोनी टीव्हीचा मोठा निर्णय! अनेक मालिका...

Come Back Serial : टीआरपी वाढीसाठी सोनी टीव्हीचा मोठा निर्णय! अनेक मालिका होणार बंद

‘या’ मालिकांचा होणार कमबॅक

मुंबई : सध्या टीव्ही इंडस्ट्रीत (TV Industry) सगळीकडे टीआरपीची (TRP) मोठी स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत एकेकाळी गाजलेले चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतही मालिकांच्या टीआरपी वाढण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील सोनी वाहिनीने देखील मालिकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोनी टीव्हीवर (Sony TV) सुरु असणारे अनेक मालिका बंद करण्यात येणार असून पूर्वीच्या काही मालिका पुन्हा टीव्हीवर पाहायला मिळणार आहेत.

सोनी टीव्हीवर महिनाभरापूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खानचा ‘आपका अपना झाकीर’ हा शो सुरू झाला होता. मात्र सोनी टीव्ही वाहिनीने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुंबूल तौकीर खानच्या ‘काव्या’ मालिकेसह अनेक मालिका अडचणीत येणार आहेत.

कोणत्या मालिका करणार कमबॅक?

  • पूर्वी सोनी टीव्ही वाहिनीवरील ‘सीआयडी’ (CID) या मालिकेने सर्वाधिक टीआरपी गाठला होता. या मालिकेसह एसीपी प्रद्युमन, दया-अभिजीत यांच्या साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी भरघोस प्रेम दिले होते. त्यामुळे आता लवकरच सोनी टीव्ही वाहिनीवर सीआयडी’चे जुने एपिसोड्स पुन्हा दाखवले जाणार आहेत.
  • त्याचबरोबर ‘क्राइम पेट्रोल’ (Crime Petrol) ही मालिका देखील पुन्हा दाखवली जाणार आहे.
  • याशिवाय ‘मेरे साई’ (Mere Sai) या शोलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, त्यामुळे आता तो पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
  • तसेच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’, ‘इंडियन आयडॉल’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोणत्या मालिकांचा निरोप?

‘काव्या- एक जज्बा, एक जुनून’, ‘पुकार दिल से दिल तक’ आणि ‘ज्युबली टॉकीज’ या डेली सोपचे चित्रीकरण आधीच बंद करण्यात आले आहे. सध्या मालिकांचे चित्रीकरण पूर्ण झालेले भाग प्रसारीत केले जाणार आहेत. त्यामुळे काही आठवडे या मालिकांचे प्रसारण होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -